Mumbai Rains : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; शाळांना सुट्या

heavy rains in Mumbai orange alert by IMD
heavy rains in Mumbai orange alert by IMD

मुंबई : मुंबईला सलग तिसऱ्या दिवशी ही पावसाने झोडपून काढले. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईत 249.7 मिमीची नोंद केली आहे. सोमवारी गणपती आगमनासह मुसळधार पावसाने पुन्हा श्री गणेशा केला. मुंबईत सोमवारी दिवसभरात 131.4 मिमी पाऊस पडला तर मंगळवारी 118.3 मिमी पाऊस पडला. आजही मुंबईत मुसळधार पाऊस राहील,असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. यामुळे पालिकेने खबरदारी म्हणून मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. याचबरोबर लोकांनी समुद्र किनाऱ्यांपासून लांब राहावे अस आवाहन ही केले आहे.

मुंबईत आजही पावसा हा जोर कायम आहे. आज (ता. 3) सकाळी 8.30 पर्यंत कुलाबा येथे 122, तर सांताक्रूझ येथे 118 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच सकाळी 7 ते 8 या एका तासात भांडूप कॉम्प्लेक्स येथे 14, बिल्डिंग प्रपोजल ऑफिस येथे 13, चेंबूर एम वेस्ट वॉर्ड ऑफिस येथे 11.44, दहिसर फायर स्टेशन येथे 12 तर अंधेरी के वेस्ट कार्यालय येथे 11 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.रात्री ही पावसाचा जोर कायम राहिल्याने माटुंगा गांधी मार्केट येथे पाणी भरल्याने काही काळासाठी वाहतूक वळविण्यात आली होती. सकाळी 6 वाजून 45 मिनिटांपासून वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली.

पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये पावसाचा जोर आजही कायम राहणार आहे.तसेच हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार जोरदार पाऊस पडत राहणार असल्याने शाळा सोडण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत.गणेशोत्सव सुरू असताना शाळांना 5 दिवासाची सुट्टी असते.मात्र त्यानंतरही काही माध्यमांच्या शाळा सुरू असतात.त्या शाळांना सुट्टी जाहीर करताना जे विद्यार्थी शाळेत आले आहेत त्यांना सुरक्षित घरी सोडावे असे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत.

रेल्वेसेवा विस्कळीत
सतत पडणाऱ्या संततधार पावसामुळे मध्यसह पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाणे, कांजुरमार्ग, विक्रोळी, कुर्ला दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशीराने सुरु आहे. त्यामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यमुळे कामाला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com