esakal | येत्या दोन दिवसात कसा असेल मुंबईत पाऊस जाणून घ्या अपडेट्स
sakal

बोलून बातमी शोधा

येत्या दोन दिवसात कसा असेल मुंबईत पाऊस जाणून घ्या अपडेट्स

मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील काही भागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्‍यता वेधशाळेने वर्तवली आहे. तर,सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात 204 मि.मी पर्यंत पावसाचा अंदाज आहे.

येत्या दोन दिवसात कसा असेल मुंबईत पाऊस जाणून घ्या अपडेट्स

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबईः  मुंबई,ठाण्यात शुक्रवारी संध्याकाळी मेघगर्जनेसह पावसाची रिपरीप सुरु झाली. आज सकाळपासूनच मुंबईसह ठाण्यातही पाऊस सुरु झाला आहे.  नवी मुंबई,कल्याण डोंबिवलीच्या भागात शुक्रवारी संध्याकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील काही भागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्‍यता वेधशाळेने वर्तवली आहे. तर,सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात 204 मि.मी पर्यंत पावसाचा अंदाज असून अंबर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईत मागील काही दिवसांपासून क्वचितच पावसाची एखादी सर कोसळत आहे. मात्र शुक्रवारी संध्याकाळी ढग दाटून आले होते. मुंबई ठाण्यात पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या. तर,नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीच्या काही भागात जोरदार पाऊस झाला. बेलापूर येथे 78.6 मि.मी आणि भोईरवाडी येथे 72.3 मि.मी पाऊस नोंदविण्यात आला.

मुंबई, ठाणे, रायगडमधील काही भागात पुढील जोरदार पावसाचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. मुंबईत विद्याविहार येथे सर्वाधिक 18 मि.मी आणि ठाणे शहरात ठिकठिकाणी 5 ते 6 मि.मी पावसाची नोंद झाली.

अधिक वाचाः  एकनाथ खडसेंची फडणवीसांवर टीका, पत्नी अमृता फडणवीस म्हणतात... 

कुलाबा येथे शुक्रवार संध्याकाळपर्यंत कमाल 28.6 आणि किमान 33.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सांताक्रुझ येथे कमाल 33.2 आणि किमान 26.5 अंश सेल्सिअस तापामानाची नोंद झाली आहे. संध्याकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

अधिक वाचाः  सावधान! मुंबईतल्या 'या' भागात वाढतोय कोरोनाचा धोका

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात आज 204 मि.मी पर्यंत पाऊस होण्याची शक्‍यता आहे. या दोन जिल्ह्यांसाठी अंबर अलर्ट जारी करण्यात आला असून सर्व यंत्रणांना सज्जतेचा इशारा देण्यात आला आहे. 

----------------

(संपादनः पूजा विचारे) 

Heavy rains in Mumbai Thane Amber Alert in Ratnagiri Sindhudurg

loading image