मुंबईत पावसाचा जोर ओसरला; ठाणे, पालघर रायगडचीही जाणून घ्या स्थिती

समीर सुर्वे
Monday, 24 August 2020

मुंबईत पावसाचा जोर ओसरला असून गुरुवारपर्यंत मुंबईसह ठाणे, पालघर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात अशीच परिस्थिती राहाणार आहे. तर, रायगड रत्नागिरी मध्ये उद्या मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

मुंबई : मुंबईत पावसाचा जोर ओसरला असून गुरुवारपर्यंत मुंबईसह ठाणे, पालघर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात अशीच परिस्थिती राहाणार आहे. तर, रायगड रत्नागिरी मध्ये उद्या मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. गौरी गणपती विसर्जनला रत्नागिरी रायगडमध्ये पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्‍यता आहे.

लॉकडाऊनमध्ये यु ट्युब व्हिडिओ पाहून केली 7 स्पोर्ट्स बाईकची चोरी; पोलिसांनी केली अटक

मुंबईत आज दहिसर येथे 67 मि.मी त्या खालोखाल महालक्ष्मी येथे 33.5 मि.मी पावसाची नोंद झाली. इतर ठिकाणी अधून मधून पावसाची सरी कोसळत होत्या. पुढील गुरुवार पर्यंत मुंबईत अशीच परिस्थिती राहाणार आहे. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होऊ 1 ते 2 अंशाची वाढ होऊन 31 अंशा पर्यंत पोहचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.मुंबईसह ठाणे, पालघर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातही पुढील गुरुवार पर्यंत हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील.

डहाणू तलासरी परिसर पुन्हा भूकंपाने हादरला; दिवसभरात अनेक सौम्य धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

तर,रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात उद्या जोरदार पावसाची शक्‍यता असून नंतर दोन दिवस हलक्‍या सरी कोसळतील.असा अंदाज आहे.गौरी गणपतीचे विसर्जन गुरुवारी होणार आहे.या दिवशी रत्नागिरी रायगड परीसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता आहे.

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains recede in Mumbai; Find out the status of Thane, Palghar and Raigad