esakal | कुंद्राच्या कार्यालयात मिळालं छुपं कपाट; अनेक 'राज' उलगडणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Kundra

कुंद्राच्या कार्यालयात मिळालं छुपं कपाट; अनेक 'राज' उलगडणार?

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : पॉर्नोग्राफी रॅकेटमधील कथीत प्रमुख सुत्रधार असलेला उद्योगपती राज कुंद्रा याच्या अंधेरी येथील कार्यालयात पोलिसांना एक छुपं कपाट आढळून आलं आहे. या कपाटात अनेक महत्वाची कागदपत्रे असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे याप्रकरणातील अनेक राज उलगडण्याची शक्यता आहे. (hidden cupboard found in Raj Kundra Andheri office Many secrets to unfold aau85)

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याचं मुंबईतील अंधेरी इथं विहान आणि जेएल स्ट्रीम नावांचं कार्यालय आहे. पॉर्नोग्राफी रॅकेटप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गु्न्हे शाखेनं इथं शनिवारी रात्री उशीरा छापा टाकला. या ठिकाणी पोलिसांनी एक छुपं कपाट आढळून आलं. या कार्यालायत अनेक महत्वाची कागदपत्रे आढळून आली आहेत.

loading image
go to top