esakal | गणेशभक्तांनो सावधान! समुद्रात उसळणार मोठ्या लाटा
sakal

बोलून बातमी शोधा

High alert on coastal areas in mumbai

आज मंगळवारी दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन होत आहे. त्याच वेळी दुपारी 2 वाजून 21 मिनिटांनी समुद्राला भरती येणार आहे. यावेळी 4.54 मीटरच्या लाटा समुद्रात उसळणार आहेत.

गणेशभक्तांनो सावधान! समुद्रात उसळणार मोठ्या लाटा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आज दीड दिवसांच्या श्री गणेश मूर्तीचं विसर्जन होत आहे. पालिकेने विसर्जनासाठी अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली असली तरी गणेशभक्त समुद्रात विसर्जन करणं पसंत करतात. अश्यावेळी अनेक गणेशभक्त खोल पाण्यात उतरण्याची शक्यता असते. मात्र, आज समुद्राला मोठी भरती येणार असल्याने समुद्रापासून लांब राहण्याचे आणि समुद्रात न उतरण्याचं आवाहन पालिकेने केले आहे.

आज मंगळवारी दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन होत आहे. त्याच वेळी दुपारी 2 वाजून 21 मिनिटांनी समुद्राला भरती येणार आहे. यावेळी 4.54 मीटरच्या लाटा समुद्रात उसळणार आहेत. भरतीच्या काही तास आधी व काही तास नंतर समुद्रामधील पाण्याची पातळी वाढलेली असते. याचवेळी अनेक गणेश भक्त समुद्रात गणेश मूर्तीचं विसर्जन करत आहेत.

या दरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून गणेश भक्तांनी काळजी घ्यावी व पालिकेने केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

loading image
go to top