esakal | मुंबईत एअर-स्ट्राईकची भीती? मुंबई पोलिसांनी घेतला मोठा निर्णय..
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत एअर-स्ट्राईकची भीती? मुंबई पोलिसांनी घेतला मोठा निर्णय..

मुंबईत एअर-स्ट्राईकची भीती? मुंबई पोलिसांनी घेतला मोठा निर्णय..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - उद्या भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रात आणि देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. उद्या सकाळी दिल्लीत राजपथवर होणारं पथसंचलन सर्वांनाच रोमांचित करणारं असतं. 

मुंबईत देखील प्रजासत्ताकदिनाचं अवचित्य साधून संचलन समारंभाचं आयोजन करण्यात येतं. मुंबईतही शिवाजीपार्कवर या संचलनाचे आयोजन करण्यात येतं. यावर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीत राजपथवर होणाऱ्या पथसंचलनात सहभागी होऊ शकलेला नाही. अशात दर्यासारंग-कान्होजी आंग्रे यांच्या थीमवरील महाराष्ट्राचा चित्ररथ मुंबईतही शिवाजी पार्कवर होणाऱ्या संचलनात सहभागी होणार आहे.

मुंबईच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबईत अनेकठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. मुंबईतील शिवाजीपार्कवर होणाऱ्या पथसंचलनावावर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचसोबत मुंबईत 'हवाई उड्डाण प्रतिबंधित क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आलंय. जारी करण्यात आलेय या बंदीअंतर्गंत मुंबईत उडवले जाणारे अतिलघु विमानं म्हणजेच ड्रोन्स याचसोबत पॅराग्लायडिंगवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत कुणालाही ड्रोनचा वापर करता येणार नाही.

मोठी बातमी - "हिंदुत्वाच्या मुद्यावर बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामन्याच्या अग्रलेखातून बाहेर"

 

मुंबईत पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. उद्या मुंबई होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनेक अतिमहत्वाच्या व्यक्ती उपस्थित असणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून हे आदेश देण्यात आले आहेत. २२ फेब्रुवारीपर्यंत मुंबईत या उपकरणांच्या वापरावर बंदी असणार आहे. 

high alert in mumbai not drons are allowed to fly in mumbai till 22nd February 

loading image