मुलांना दोन्ही पालकांची आवश्यकता, विभक्त पित्याला मुलाला भेटण्याची न्यायालयाची परवानगी
High Court On Child Rights: विभक्त पत्नीने मुलाला त्याच्या पित्याला भेटण्याची परवानगी न दिल्यामुळे विभक्त पित्याने न्यायालयात धाव घेतली. यावर मुलांना दोन्ही पालकांची आवश्यकता असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले.
मुंबई : पती-पत्नीमध्ये कितीही मतभेद असले तरीही मुलांना दोन्ही पालकांच्या सहवासाची, प्रेमाची आवश्यकता असते, असे मत नोंदवून उच्च न्यायालयाने नुकतेच एका विभक्त पित्याला मुलाला भेटण्याची परवानगी दिली.