Mumbai News: एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Full Parental Rights: एकट्या आईला पूर्ण पालक म्हणून मान्यता देण्यासाठी उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये एकल मातेने वाढवलेल्या मुलाला तिच्या शाळेच्या नोंदीत आईचे नाव आणि जात बदलण्याची परवानगी देण्यात आली आहे.
High Court

High Court

ESakal

Updated on

मुंबई : एकल मातेने वाढवलेल्या पाल्याला केवळ गरज म्हणून वडिलांचे नाव, आडनाव आणि जात लावण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. एकट्या आईला पूर्ण पालक म्हणून मान्यता देणे हा तिचा संविधानिक अधिकार आहे. वडिलांच्या अनुपस्थितीत पाल्याचे संगोपन करणाऱ्या आईला दुय्यम स्थान देण्याचा आग्रह तथाकथित विकसित समाज करू शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले. एकल मातेने वाढवलेल्या अल्पवयीन मुलाला तिच्या शाळेच्या नोंदीत आईचे नाव आणि जात बदलण्याची परवानगी देताना उच्च न्यायालयाने नुकतेच हे मत व्‍यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com