

High Court Order Over Kanjurmarg dumping ground
ESakal
मुंबई : कांजूरमार्ग कचराभूमीतून पसरणाऱ्या दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अल्पकालीन योजना सुचवत त्यांची अंमलबजावणी करण्याचे आदेश सोमवारी (ता. २२) उच्च न्यायालयाने महापालिका आणि राज्य सरकारला दिले. प्रदूषणामुळे श्वास घेणे कठीण झाले असून, शुद्ध हवा हा प्रत्येकाचा जगण्याचा मूलभूत अधिकार आहे, असे निरीक्षण न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरती साठे यांच्या खंडपीठाने नोंदवले.