मुंबई : वैद्यकीय चाचण्यांमध्ये अपात्र ठरल्याने वयाची पन्नाशी ओलांडलेल्या दोन महिलांनी कृत्रिम गर्भधारणेसाठी केलेली याचिका न्यायालयाने नुकतीच निकाली काढली..कृत्रिम गर्भधारणेसाठी न्यायालयाने दोन्ही महिलांच्या शारीरिक सुदृढतेच्या तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार अहवाल न्यायालयात सादर करण्यात आले. अहवालांचा विचार करता याचिकांमध्ये या तरतुदीच्या घटनात्मक वैधतेची तपासणी करण्याचे कोणतेही कारण उरलेले नाही, असे प्रभारी मुख्य न्या. रवींद्र घुगे आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने नमूद करून दोन्ही याचिका निकाली काढल्या. याचिकाकर्तीनी २०२१च्या 'साहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान' (एआरटी) कायद्यातील वयाशी संबंधित अटीच्या तरतुदीला आव्हान दिले होते..Mumbai News: पोलीस कायद्यापेक्षा मोठे नाहीत, शालार्थ आयडीप्रकरणी उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले.या तरतुदीनुसार, दान केलेले शुक्राणू स्वीकारणाऱ्या महिलेसाठी वयाची अट ५० वर्षे निश्चित केली आहे. ही अट घटनाबाह्य असल्याची मागणी याचिकाकर्त्या महिलांनी केली होती. आपण गर्भधारणा पूर्ण काळापर्यंत टिकवून ठेवण्यासाठी आणि बाळाला जन्म देण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सक्षम व पात्र असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र एका स्त्रीरोगतज्ज्ञाने आपल्याला दिल्याचेही त्यांनी याचिकेत म्हटले होते..वैद्यकीयदृष्ट्या दोघीही अपात्रनुकत्याच झालेल्या सुनावणीवेळी दोघींच्या या चाचणीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. दोन्ही महिला कृत्रिम गर्भधारणेच्या प्रक्रियेसाठी वैद्यकीयदृष्ट्या अपात्र आहेत. एका याचिकाकर्तीला गेल्या १५ वर्षांपासून 'हायपोथायरॉईडीझम'चा त्रास असून, तिला रजोनिवृत्ती होऊन दोन वर्षे झाली होती. तर दुसऱ्या याचिकाकर्तीला चार वर्षांपासून मधुमेह असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. त्या कृत्रिम मातृत्वासाठी वैद्यकीयदृष्ट्वा अपात्र असल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला होता. त्याची दखल घेऊन न्यायालयाने याचिका निकाली काढल्या..Crime: प्रियकराला ठार मारून तुकडे केले, पुरावे मिटवण्यासाठी मृतदेह भिजत ठेवला, पण 'त्या' एका व्हाईस मेलने...; कल्याणमध्ये काय घडलं?.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.