high court
Esakal
मुंबई : कुर्ला पश्चिम येथे गेल्या वर्षी झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघात प्रकरणातील आरोपी चालक संजय मोरेला उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. मोरेवरील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याचे निरीक्षण नोंदवून सत्र न्यायालयाने दोनवेळा जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर मोरेने जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर न्या. आर. एम. जोशी यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. नजीकच्या काळात खटला पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने मोरेला जामीन मंजूर केला.