

Trees Cutting
ESakal
मुंबई : पायाभूत सुविधांच्या दृष्टीने प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे सांगून पालघर जिल्ह्यातील डहाणू उपकेंद्रापासून सूर्यानगर, कवडास आणि जव्हारपर्यंत १३२-केव्ही डीसी पारेषण वाहिनी उभारण्यास उच्च न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली. त्यासाठी ९४.६८ हेक्टर वनजमिनीचे आरक्षण बदलण्यास आणि २१,०२२ झाडे तोडण्यासही न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे.