
मुंबई : ‘कायदेशीर भाषा’ या विषयाची उत्तरपत्रिका हिंदीत लिहिल्याने ५६ वर्षीय विद्यार्थ्यांला महागात पडले आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या (बीसीआय) नियमांनुसार, या विषयाची उत्तरपत्रिका इंग्रजीतच लिहिणे अनिवार्य असल्याचे निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवत विद्यार्थ्याला दिलासा देण्यास नकार दिला.