Mumbai High court
Esakal
मुंबई : मराठा समाज मोठ्या प्रमाणात पुढारलेला आणि मुख्य प्रवाहात आहे. मात्र या समाजातील, विशेषकरून दुर्गम भागातील काही जण मुख्य प्रवाहापासून नक्कीच अलिप्त आहेत. तथापि या कारणास्तव सरसकट मराठा समाजाला ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून स्वतंत्र १० टक्के आरक्षण देता येणार नाही, असा दावा शुक्रवारी (ता. ९) आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला.