Ganeshotsav: पीओपी मूर्तीप्रकरणी निकाल राखीव, न्यायालयीन परवानगीशिवाय विसर्जनाला बंदी कायम

Mumbai High Court: पीओपी मूर्तीप्रकरणी सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. यामुळे न्यायालयीन परवानगीशिवाय विसर्जनाला बंदी कायम असणार आहे.
High Court On POP idol visarjan

High Court On POP idol visarjan

ESakal

Updated on

मुंबई : प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तीच्या संदर्भातील याचिकांवर प्रदीर्घ सुनावणीनंतर शुक्रवारी (ता. १४) उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला. त्याच वेळी पीओपी मूर्तीचे न्यायालयाच्या परवानगीशिवाय नैसर्गिक जलाशयात विसर्जन न करण्याबाबतचा गेल्या वर्षी ९ जूनला दिलेला अंतरिम आदेश निर्णय येईपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com