Mumbai High Court
sakal
मुंबई : विवाहित महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी भारतीय दंड संहितेचे कलम ४९८अ लागू करण्यात आले; तरीही वैवाहिक हिंसाचारात लक्षणीय वाढ झाली आहे. अनेकदा पतीच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना गोवण्याची प्रवृत्ती हल्ली खूपच बळावली असल्याचे निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले. एका वैवाहिक वादाच्या प्रकरणात पतीसह त्याच्या सात नातेवाइकांविरुद्ध दाखल केलेला गुन्हा आणि आरोप न्यायालयाने रद्द केला.