Mumbai News: एकुलती एक मुलगी, १६ वर्षे कोमात, ३७ लाख भरपाई देण्याचे आदेश; वेदनांची भरपाई पैशात होणार नाही !

Mumbai High Court: १६ वर्षे कोमात राहिलेल्या मुलीच्या मृत्यूनंतर पालकांच्या वेदनांची भरपाई पैशात होऊच शकत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on

मुंबई : जवळपास १६ वर्षे कोमात राहिलेल्या एकुलत्या एक मुलीला गमावणाऱ्या पालकांच्या वेदनांची भरपाई पैशात होऊच शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले. पीडितेच्या कुटुंबाला मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने (मॅक्ट) दिलेली सात लाख रुपयांची भरपाईची रक्कम ३७ लाखांपर्यंत वाढवून देण्याचे आदेश न्या. जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने विमा कंपनीला दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com