Mumbai News: मानवी तस्करीची बळी ठरली, पण त्या बांगलादेशी महिलेचा जबाब का नोंदवला नाही? उच्च न्यायालयाची विचारणा

Mumbai High Court: मानवी तस्करीची बळी ठरलेल्या एका बांगलादेशी महिलेचा जबाब नोंदवण्याबाबत उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
mumbai high court

mumbai high court

sakal

Updated on

मुंबई : मानवी तस्करीची बळी ठरलेल्या एका बांगलादेशी महिलेचा जबाब नोंदवण्याचा स्पष्ट आदेश देऊनही आजमितीस तिचा जबाब का नोंदवला नाही, असा प्रश्न उच्च न्यायालयाने नुकताच उपस्थित केला. त्यासंदर्भात सत्र न्यायालयाकडून स्पष्टीकरणही मागितले. या महिलेला परत मायदेशी पाठवणे आवश्यक असल्याने सत्र न्यायालयाने २४ मार्चपर्यंत तिचा जबाब नोंदवावा, असे आदेश न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने सत्र न्यायालयाला दिले. सध्या ‘रेस्क्यू फाउंडेशन’कडून महिलेची देखभाल केली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com