Mumbai High court
Esakal
मुंबई : शिक्षकांविरुद्ध गुन्हे किंवा त्यांना अटक करू नये, असे याआधी आदेश देण्यात आले आहेत. तरीही करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत उच्च न्यायालयाने नुकतीच नाराजी व्यक्त केली. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांना राज्यभरातील शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांतील अनियमिततेबाबत विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) सुरू असलेल्या तपास प्रक्रीयेपासून दूर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.