

Mumbai High Court
sakal
मुंबई : अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या दक्षिण मुंबईतील ‘सारा पॅलेस’ या इमारतीतील बेकायदा बांधकामे पाडून टाका, असे आदेश नुकतेच उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले. मुंबई अग्निशमन दलाने अहवालात अग्निसुरक्षेसाठी आवश्यक यंत्रणा नसल्याचे म्हटले आहे. याची दखल घेताना न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने या अहवालामुळे आम्हाला धक्का बसल्याची तीव्र प्रतिक्रिया नाेंदवली.