
High Court ordered municipalities about manholes
ESakal
मुंबई : राज्यातील महापालिकांच्या हद्दीतील एकूण मॅनहोलची संख्या आणि किती मॅनहोल संरक्षक जाळ्यांनी सुरक्षित आहेत, त्याबाबत माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. डोंबिवलीत गेल्या महिन्यात १३ वर्षांच्या मुलाचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले.