Mumbai High Court
esakal
मुंबई
Mumbai High Court: राज्यात आमदार-खासदारांवर ३९८ खटले, लवकर निकाली काढा; हायकोर्टाचे विशेष न्यायालयांना आदेश
Criminal Case : खासदार आणि आमदारांविरुद्ध ३९८ फौजदारी खटले दाखल आहेत. याबाबत जलदगतीने निकाली काढण्यासाठी आदेश हायकोर्टाने विशेष न्यायालयांना दिले.
मुंबई : खासदार आणि आमदारांविरुद्ध सद्य:स्थितीला ३९८ फौजदारी खटले दाखल असल्याची माहिती राज्य सरकारने नुकतीच उच्च न्यायालयात दिली. त्यावर उच्च न्यायालयाने हे खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालयांना दैनंदिन सुनावणी घेण्याचे आदेश दिले.