Mumbai High Court
esakal
मुंबई : कांदळवन संवर्धनासंदर्भातील आधीच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरलेल्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनांवर उच्च न्यायालयाने टीका केली. या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दोन महिन्यांत अधिसूचित दहा हेक्टरवरील खारफुटीच्या जमिनी राज्याच्या वन विभागाला हस्तांतरित करण्याचे आदेशही दिले.