mumbai high court
sakal
मुंबई : अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी नाशिक येथील कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेला फाशीच्या शिक्षेचा निर्णय मंगळवारी उच्च न्यायालयाने रद्द केला. सुनावणीदरम्यान आरोपीकडे वकील नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्याची दखल घेऊन हा खटला नव्याने चालविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नाशिक कनिष्ठ न्यायालयाला दिला.