

High Court rejected government Clain of strategic land
Sakal
मुंबई : ठाण्यातील मानपाडा परिसरातील १९३ एकर मोक्याच्या जमिनीवरील राज्य सरकारचा दावा उच्च न्यायालयाने नुकताच फेटाळून लावला आणि गेल्या पाच दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या या कायदेशीर वादावर पडदा टाकला. प्रक्रियात्मक चुकांमुळे १९७५ मध्ये सरकार ही जमीन खासगी वन म्हणून कायदेशीररित्या संपादित करण्यात अपयशी ठरल्याचेही निरीक्षण न्यायालयाने सरकारचा दावा फेटाळताना नोंदवले. न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकारला दणका मिळाला आहे.