Mumbai High court
Esakal
मुंबई : जलदगती न्यायालयातील रिक्त पदांच्या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या प्रश्नांची उत्तरे उद्धट, आक्रमक आणि मोठ्या आवाजात दिल्याबद्दल उच्च न्यायालयाने विधी व न्याय विभागाचे सचिव तसेच सल्लागार दिलीप घुमारे यांना धारेवर धरले. त्याचे वर्तन पूर्णतः अक्षम्य असल्याचे ताशेरेही ओढत न्यायालयाने अवमान नोटीस बजावली.