

High Court Slams Ramesh Mhatre
ESakal
मुंबई : जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी ज्यांच्याकडून मते घेतात, निवडून येतात त्यांनाच हे लोकप्रतिनीधी नंतर मारतात, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. २७) ताशेरे ओढले. डोंबिवलीतील डॉक्टरांवर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांची कृती धक्कादायक आणि विपरीत परिणाम करणारी असल्याचेही न्यायालयाने सुनावले.