

High Court On Malnutrition
ESakal
मुंबई : राज्यातील आदिवासी पट्ट्यात कुपोषणामुळे बालके आणि गर्भवती महिलांच्या होणाऱ्या मृत्यूंना रोखण्यासाठी राज्य सरकारकडून फारच तोकडे प्रयत्न झाले. समस्या मोठी आणि गंभीर आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी तिच्या मुळाशी जावे लागेल. त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि दृढ निश्चयाची कमतरता आवश्यक असल्याचे सुनावत सोमवारी (ता. १९) उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले.