Mumbai News: एका रात्रीत शक्य नाही पण लोकांच्या तक्रारींवर उपाय आवश्यक; हायकोर्टानं BMCसह राज्य सरकारला फटकारलं

Bombay High Court: मुंबईतील कांजूरमार्ग कचराभूमीमुळे दुर्गंधी आणि प्रदूषणाच्या समस्या वाढत चालला आहे. या समस्याचे निराकरण करण्यासाठी उपाययोजनांची गरज असल्याचे न्यायालयाने म्हटले.
Kanjurmarg Landfill Crisis

Kanjurmarg Landfill Crisis

ESakal

Updated on

मुंबई : कांजूरमार्ग कचराभूमीतील दुर्गंधी आणि दीर्घकालीन प्रदूषणाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून अधिक इच्छाशक्ती आणि वचनबद्धता आवश्यक आहे, असे निरीक्षण मंगळवारी (ता. २४) उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच या गंभीर समस्येच्या निराकरणासाठी तांत्रिकरीत्या देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणेची तातडीची गरजही न्यायालयाने बोलून दाखवली. त्यासोबतच कचराभूमीतून निघणारी दुर्गंधी आणि प्रदूषण रोखण्यासाठी अल्पकालीन उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com