Mumbai News: मद्य परवानगीवर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह, धोरणाबाबत पुनर्विचार करण्याचे आदेश
Mumbai Sunburn Festival: मुंबईत सनबर्न फेस्टिव्हल सुरू झाला असून यामध्ये मद्यविक्री करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र यावर पुनर्विचार करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई : मुंबईत सुरू झालेल्या सनबर्न फेस्टिव्हलमध्ये मद्यविक्री करण्यास राज्य सरकारच्या परवानगीवर उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच या धोरणावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले.