POD Taxi: आधी वृक्षारोपण करा! पॉड टॅक्सी प्रकल्पावरून न्यायालयाचा सरकारला इशारा

High Court On Pod Taxi: पॉड टॅक्सी प्रकल्पावरून न्यायालयाने सरकारला वृक्षतोडीची परवानगी मागण्यापूर्वीच आगाऊ वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचा प्रामाणिक प्रयत्न सिद्ध करा, असा इशारा दिला.
High Court On Pod Taxi

High Court On Pod Taxi

ESakal

Updated on: 

मुंबई : आम्ही केवळ बांधकामांचे तज्ज्ञ असून झाडे लावणे हे वन विभागाचे काम आहे, अशी जबाबदारी झटकणारी भूमिका सरकारी यंत्रणांनी न घेता विकासकामे आणि पर्यावरणाचा समतोल एकाच वेळी साधला जाईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. वृक्षतोडीची परवानगी मागण्यापूर्वीच आगाऊ वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचा प्रामाणिक प्रयत्न सिद्ध करा अन्यथा थेट परवानगी देणे कठीण होईल, असा इशाराच उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. २५) एमएमआरडीए आणि राज्य सरकारला दिला.

Loading content, please wait...