खासगी बसगाड्यांवाल्यांनो जादा भाडे आकाराल तर याद राखा... कारवाई होणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 मार्च 2020

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शाळा, महाविद्यालयांसह चित्रपटगृहांची सेवा बंद केली. नागरिकांच्या सेवेसाठी सरकारकडून आवश्‍यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. या दरम्यान, खासगी बसचालकांकडून जादा प्रवास भाडे आकारले जात असेल, तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहेत

मुंबई: राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शाळा, महाविद्यालयांसह चित्रपटगृहांची सेवा बंद केली. नागरिकांच्या सेवेसाठी सरकारकडून आवश्‍यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. या दरम्यान, खासगी बसचालकांकडून जादा प्रवास भाडे आकारले जात असेल, तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहेत. 

मुंबईच्या अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अत्यावश्‍यक सेवा वगळता खबरदारीचा उपाय म्हणून काही खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. तसेच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थी, प्रवासी गावी जात आहेत. या काळात खासगी बसचालकांकडून जादा प्रवास भाडे आकारत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. बसचालकांनी सामाजिक बांधिलकीतून योग्य ती खबरदारी घेऊन सहकार्य करावे, असेही परब यांनी या वेळी संगितले. 

राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित

बसस्थानकांवर स्वच्छता राखा 
राज्यातील प्रमुख शहरातील बसस्थानकांवरील बैठक व्यवस्था दिवसातून दोन-तीन वेळा स्वच्छ केली जावी, तसेच बसस्थानकाचा परिसर जंतुनाशकांची फवारणी करून निर्जंतुक केला जावा, वाहक कर्तव्यावर निघताना त्यांच्याकडे सॅनिटायझरची एक बाटली देण्यात यावी, प्रवाशांच्या गरजेनुसार त्यांनी ती उपलब्ध करावी, याबरोबरच आगारातून बाहेर पडणारी प्रत्येक बस स्वच्छ धुऊनच मार्गस्थ केली जावी, तसेच बसस्थानकावर कोरोना विषाणूंच्या संदर्भात जनजागृती करण्याच्या सूचना परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

High fares take strict Action on private buses


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High fares take strict Action on private buses