esakal | किरकोळ बाजारात भाजीचे दर दुप्पट
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

किरकोळ बाजारात भाजीचे दर दुप्पट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पनवेल : कृषी उत्पन्न बाजार (Market) समितीत घाऊक दरात खरेदी केलेली भाजी (Vegetable) किरकोळ बाजारात दुप्पट तिप्पट दरात विक्री (Selling) होत आहे. भाज्यांची (Vegetable) आवक वाढल्याने घाऊक बाजारात (Market) त्यांचे दर कमी झाले असले, तरी किरकोळ व्यापारी दरात वाढ करून भाजी विकत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चाट बसत आहे.

शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात भाजीची लागवड केली आहे. भाजीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात झाल्याने विविध कृषी उत्पन्न बाजारात मोठ्या प्रमाणात झालेल्या भाजीच्या आवाकीमुळे भाज्यांचे दर गडगडल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी, मागील महिन्यात ३ ऑगस्टला घाऊक बाजारात १० ते १२ रुपये किलो दराने असलेले टोमॅटोचे आता ६ ते ८ रुपयांवर आले आहेत. १८ ते २० रुपये किलो दराने विकलेली वांगी ८ ते १० रुपयावर आली आहे. ३६ ते ४० रुपयांनी विक्री होणाऱ्या गवारला २० ते २४ रुपयांचा भाव मिळत आहे. मिरची दर ३० ते ३२ रुपयांनी घसरून १८ ते २० रुपयांवर आले आहे. भाज्यांच्या दरात इतकी मोठी घसरण होऊनही सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा फायदा मिळत नाही.

हेही वाचा: शेतकऱ्यांनी पाडला कांदा लिलाव बंद

दुप्पट ते तिप्पट दराने याची विक्री होत असल्याने एक प्रकारे ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे किरकोळ बाजारातील भाज्यांच्या दरावरून स्पष्ट होते. दरम्यान, पनवेल पालिका हद्दीतील शहरी भागापेक्षा ग्रामीणमध्ये किलोमागे जवळपास ५ ते १० रुपये स्वस्त भाजी विक्री केली जात आहे.

loading image
go to top