मोठी बातमी : मंत्री उदय सामंत यांना आला धमकीचा फोन

सुमित बागुल
Tuesday, 15 September 2020

धमकी देणार्याने नेमकं काय म्हटलंय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार अजूनपर्यंत उदय सामंत यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केलेली नाही.

मुंबई : महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत याना धमकीचा फोन आलाय. एका अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना धमाचा फोन केलाय. या प्रकरणाची उदय सामंत यांनी दखल घेत लवकरच अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली जाणार आहे. 

खरंतर उदय सामंत हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज कुलगुरुंची भेट घेऊन विद्यार्थ्यांबाबत, अंतिम वर्षांच्या अंतिम सत्राच्या परीक्षांबाबतचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते कुलगुरूंना भेटलेत. दरम्यान या दौऱ्यावर असताना उदय सामंत यांचे PA म्हणजेच त्यांच्या स्वीय सहायकाच्या फोनवरून उदय सामंत यांना धमकीचा देण्यात आली आहे.

हेही वाचा : छम छम बारबाला झाल्यात बिझनेस वूमन, 'अशी' शक्कल लढवून भरतायत पोटाची खळगी

धमकी देणार्याने नेमकं काय म्हटलंय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार अजूनपर्यंत उदय सामंत यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केलेली नाही. टीव्ही रिपोर्टनुसार समोर आलेल्या प्राथमिक माहितीतुन ABVP च्या कार्यकर्त्यांकडून उदय सामंत याना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर येतेय.  

गेल्या काही दिवसात अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परिक्षांवरून शिवसेना विरुद्ध भाजप हा सामना चांगलाच रंगला होता. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष टोकाला गेल्याचं यामाध्यमातून पाहायला मिळतंय असं म्हंटल तर वावगं ठरू नये. दरम्यान यासंदर्भात महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत रीतसर तक्रार दाखल करणार असल्याचंही समजतंय.   

( बातमी अपडेट होत आहे ) 

higher and technical education minister of maharashtra uday samant gets threat call


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: higher and technical education minister of maharashtra uday samant gets threat call