काल एक शिक्षणमंत्री कोरोनामुक्त, तर आज दुसरे शिक्षणमंत्री कोरोनाची पॉझिटिव्ह

काल एक शिक्षणमंत्री कोरोनामुक्त, तर आज दुसरे शिक्षणमंत्री कोरोनाची पॉझिटिव्ह

मुंबईः राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारीच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. उदय सामंत यांचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. 

उदय सामंत यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, गेले दहा दिवस स्वतः विलगिकरनात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली.रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी गेले 10 दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे.. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार.

सध्या उदय सामंत यांची प्रकृती ठणठणीत असून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ते त्यांचं कामकाज सुरु ठेवणार आहेत, अशीही माहिती मिळत आहे.

वर्षा गायकवाड यांची कोरोनावर मात 

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी  त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जनतेचे प्रेम आणि सर्वांच्या शुभेच्छांबरोबरच या काळात योग्य आहार, योग, प्राणायाम, ध्यानधारणा आणि वाचन यामुळे लवकर बरे होण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मराठवाडा मुक्ती दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने गायकवाड या 15 ते 17 सप्टेंबर या कालावधीत नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होत्या. या दरम्यान त्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्या होत्या. 21 सप्टेंबरला त्यांना ताप आल्यामुळे कोरोना टेस्ट करुन घेतली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर सोमवारी म्हणजेच 28 सप्टेंबरला त्यांना घरी सोडण्यात आले. 

कोरोनानिदान झाल्यानंतर योग्य ते उपचार घ्यावेत, सकारात्मक भावना ठेऊन ध्यान धारणा करावी. तसेच आपल्यामुळे इतरांना प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी,  असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.

ठाकरे सरकारमधल्या या मंत्र्यांना कोरोनाची लागण 

ठाकरे सरकारमध्ये असलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख,  सुनील केदार, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अब्दुल सत्तार, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

Higher and technical education state minister Uday Samant corona positive

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com