फास्टॅग कॅशबॅकला सर्वाधिक प्रतिसाद, लाखो वाहनधारकांना लाभ

प्रशांत कांबळे
Friday, 22 January 2021

फास्टॅगधारक कार, जीप आणि एसयूव्ही वाहनधारकांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) जाहीर केलेल्या 5 टक्के कॅशबॅकला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

मुंबई: पथकर नाक्यावरुन कॅशलेस आणि वेगवान प्रवासासाठी फास्टॅगधारक कार, जीप आणि एसयूव्ही वाहनधारकांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) जाहीर केलेल्या 5 टक्के कॅशबॅकला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. केवळ सात दिवसात 3 लाख 45,155 वाहनधारकांनी कॅशबॅकचा लाभ घेतला असून, पथकर नाक्यांवर फास्टॅग प्रणालीच्या 100 टक्के अंमलबजावणीसाठी महामंडळाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. 

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) पथकर नाक्यावर फास्टॅगधारक कार, जीप आणि एसयूव्ही वाहनांना प्रत्येक फेरीला 11 जानेवारी 2021 पासून 5 टक्के कॅशबॅक महामंडळाने लागू केली. त्याचा योग्य परिणाम दिसून आला आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

11 ते 17 जानेवारी 2021 या कालावधीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू पथकर नाक्यावर एकूण 3 लाख 45,155 वाहनधारकांनी कॅशबॅकचा लाभ घेतला. या कॅशबॅकच्या मोबदल्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एकूण  19,08,597.85 रकमेचा परतावा वाहनचालकांच्या फास्टॅग खात्यामध्ये जमा केला आहे.

महामंडळाच्या कॅशबॅकला अपेक्षेहून अधिक प्रतिसाद मिळाला असून, वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या पथकर नाक्यावरील सर्व मार्गिका फास्टॅग प्रणालीने अद्यावतीकरणाचे काम 22 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. 26 जानेवारी पासून फास्टॅगधारक वाहनांना प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे अधिकाधिक वाहनधारकांनी त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी केले आहे.

हेही वाचा- मुंबई उच्च न्यायालयाचा सोनू सूदला धक्का, पालिकेविरोधातली याचिका फेटाळली

-----------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Highest response fastag cashback benefiting 3 lakh 45 thousand 155 vehicle owners


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Highest response fastag cashback benefiting 3 lakh 45 thousand 155 vehicle owners