
"BJP साठी हिंदुत्व मतदान मिळवून देण्याचं कार्ड"
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणारे शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
भास्कर जाधव यांनी शिवाजी पार्क येथे जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केले यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली.(Bhaskar Jadhav criticized BJP Party )
उद्धव ठाकरे हे शिल्लक सेनेचे प्रमुख आहेत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. यावर भास्कर जाधव म्हणाले, १९८४ साली भाजपचे दोन खासदार होते. मात्र भाजपची त्यावेळी कोणी टिंगल उडवली नव्हती.
मात्र आज आम्हाला कोणी शिल्लक सेना म्हणत आहे, कोणी रडकी सेना म्हणत आहे. भाजपला लोकशाही टीकवायची नाही. भाजपला संविधान संपवायचे आहे. भाजपला लहान पक्ष नष्ट करायचे आहेत.
भाजपचे वाचाळवीर शिवसेनेवर टीका करत आहेत. पण त्यांना मी सांगेन की जी हिंदूत्वाची भूमिका घेऊन भाजप देशात विस्तार करत आहे.
मात्र १९८८-८९ च्या पार्ल्याच्या पोटनिवणुकीमध्ये भाजपने काँग्रेस -राष्ट्रवादीच्या आघाडीबरोबर निवडणूक लढवली होती. त्यावेळी हिंदूत्वाची पहिली भूमिका शिवसेनेने घेतल्याचे भास्कर जाधव म्हणाले.
हेही वाचा: PM Modi: अंदमानमधील 21 निनाव बेटांना परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावे
भाजपने हिंदुत्वासाठी काहीच भोगलं नाही त्यांनी फक्त पळवायचं काम केलं. भाजपसाठी हिंदुत्व मतदान मिळवून देण्याचं कार्ड आहे, अशा प्रकारचा स्वार्थी विचार भाजपने केला. त्यामुळे ३० वर्षाची मैत्री त्यांच्या लक्षात राहणार नाही, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.
हेही वाचा: Shivsena-VBA Alliance : शिवशक्ती- भिमशक्ती युतीचा भाजपला फटका बसणार? २०१९ मध्ये काय घडलं होतं?