व्हॅलेन्टाईन्स-डे साठी थेट मॉलमधून पार्टनर घ्या भाड्यावर..

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 1 February 2020

मित्रानो फेब्रुवारी महिना लागलाय. आता तुम्हा सर्वांना आतुरता असेल १४ फेब्रुवारी म्हणजेच 'व्हॅलेन्टाईन्स-डे' ची. त्यामुळे तुम्ही गिफ्ट, स्पेशल कपडे वैगैरेची खरेदीही सुरु केलीच असेल. खरेदी सुरु केली नसेल तरी प्लॅनिंग तरी सुरु केलंच असेल. पण ही सगळी तयारी जर तुमच्याकडे पार्टनर असेल तर करून उपयोग, नाही का? पण आता काळजी करू नका, जर तुमच्याकडे पार्टनर नसेल तर तुम्हाला आता तुम्हाला थेट मॉलमधून पार्टनर भाड्यावर मिळणार आहे.

एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार आता तुम्हाला थेट मॉलमधून पार्टनर भाड्याने मिळणार आहे. आता सर्वात आधी तुम्ही म्हणाल, ही काहीतरी फालतुगिरी आहे आणि नसते धंदे आम्हाला करायचे नाहीत. तर यामध्ये तुम्ही विचार करत असलेलं 'असलं - तसलं' काहीही नाही. बरं पार्टनरला भाड्याने घेण्याचे दर देखील अत्यंत माफक आहेत. दर दहा मिनिटांसाठी तुम्हाला फक्त दहा रुपये भाडं द्यायचंय.

मोठी बातमी - Budget 2020: म्हणून मनसेने मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार..

या मॉलमध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला एका रांगेत तब्बल १५ मुली उभ्या दिसतील. दहा रुपयांच्या बदल्यात तुम्ही या मुलींसोबत दहा मिनिटं वेळ घालवू शकतात. या सर्व मुली मॉडेल्स आहेत. त्यामुळे या मुलींसोबत वेळ घालवून तुम्हाला 'फील गुड' नक्की मिळू शकतो.

या मुलींसोबत तुम्ही शॉपिंग करू शकतात. तुमच्या शॉपिंगच्या पिशव्या त्यांना पकडायला देऊ शकतात. मात्र या भाड्यावरील पार्टनरला तुम्ही त्या शॉपिंग मॉलबाहेर घेऊन जाऊ शकत नाही. या पार्टनरला तुम्हाला स्पर्श देखील करता येणार नाही. त्या मॉलच्या शॉपिंग एरियामध्ये तुम्ही या पार्टनरसोबत फिरू शकतात.  

मोठी बातमी - शरद पवार म्हणतात 'हे जेवण आयुष्यभर लक्षात राहील'

भाड्याने पार्टनर देणाऱ्या मॉलची बातमी सोशल मीडियामार्फत चांगलीच व्हायरल झालीये. हा मॉल चीनमधी एका शहरात आहे. 

hire a partner on rent for valentines day unique concept by one of the mall 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hire a partner on rent for valentines day unique concept by one of the mall