Mumbai Railway Stations : रेल्वे स्थानकातील शिशु स्तनपान केंद्रांची दयनीय अवस्था; कुर्ला स्थानक ठरते दुर्लक्षाचे केंद्र

मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील शिशु स्तनपान केंद्रांची दुर्दशा; कुर्ला स्थानकावरील अस्वच्छता, तुटलेली साधनसामग्री आणि दिशादर्शक फलकांचा अभाव यामुळे मातांचा संताप उसळला
रेल्वेची 'हिरकणी' वाऱ्यावर! कुर्ला स्थानकावर शिशु स्तनपान केंद्राची दयनीय अवस्था; देखभालीअभावी मातांची कुचंबणा

रेल्वेची 'हिरकणी' वाऱ्यावर! कुर्ला स्थानकावर शिशु स्तनपान केंद्राची दयनीय अवस्था; देखभालीअभावी मातांची कुचंबणा

Sakal

Updated on

नितीन बिनेकर

मुंबई : महिलांसाठी अत्यंत गरजेची मानली जाणारी शिशु स्तनपान केंद्रे मुंबईतील रेल्वे स्थानकांवर केवळ कागदोपत्रीच असल्याचे वास्तव समोर येत आहे. प्रवाशांची प्रचंड वर्दळ असलेल्या कुर्ला स्थानकावर या सुविधेची झालेली दुर्दशा हेच चित्र स्पष्ट करते. पश्चिमेकडील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील तिकीट खिडकीजवळ असलेले स्तनपान केंद्र पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत असून, धुळीने माखलेले आहे. केंद्राच्या बाहेर कचरा साचलेला असून, अस्वच्छतेचा तीव्र वास पसरलेला आहे. परिणामी, या केंद्राचा वापर करणे तर दूरच, तिथे काही क्षण थांबणेही महिलांसाठी अस्वस्थ करणारे ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com