
आदित्य ठाकरे यांनी सहा वर्षाच्या बाळाला मदतीचा हात दिला आहे. या बाळाच्या हृदयात जन्मतःच तीन ब्लॉक आहेत. त्यामुळे त्याच्या उपचारासाठी बाळाच्या पित्याकडे आदित्य ठाकरे यांनी एक लाख रुपयांची मदत सुपूर्द केली आहे.
मुंबई ः आपल्या जन्मदिवशी अनेकजण वेगवेगळ्या उपक्रमांचे नियोजन करतो
परंतु याच दिवशी आपल्याला कोणाचा जीव वाचवता आला तर, त्यापेक्षा मोठे समाधान ते काय असू शकते. राज्याचे पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांचा आज जन्मदिवस होय. आधीच कोरोनाच्या संकटामुळे अदित्य यांनी कार्यकर्त्यांना भेटून किंवा कोणताही वायफळ खर्च करून शुभेच्छा देऊ नये असे आवाहन केले आहे. त्यातही आपल्या जन्मदिवसाचा खर्च त्यांनी सत्कारणी लावला आहे.
विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीचा ५, ४, ३ चा फॉर्म्युला? म्हणून काँग्रेस नाराज ?
आदित्य ठाकरे यांनी सहा वर्षाच्या बाळाला मदतीचा हात दिला आहे. या बाळाच्या हृदयात जन्मतःच तीन ब्लॉक आहेत. त्यामुळे त्याच्या उपचारासाठी बाळाच्या पित्याकडे आदित्य ठाकरे यांनी एक लाख रुपयांची मदत सुपूर्द केली आहे.
नवीमुंबईतील घणसोली परिसरात अब्दुल अंसारी नावाचे गृहस्त राहतात. त्यांना नुकतेच बाळ झाले होते. एरोलीच्या मनपा रुग्णालयात जन्माला आलेल्या बाळाच्या जीवाला धोका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बाळाच्या हृदयात नुकतेच तीन ब्लॉक आढळून आल्याने, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुलंड येथील फोर्टिस रुग्णालयात या बाळावर उपचार सुरू आहे. हे बाळ जीवन मरणाशी झुंज देत आहे.
मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
फोर्टीस या खासगी रुग्णालयात उपचारासाठी बाळाच्या वडिलांकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यांनी अनेकांकडे मदत मागितली परंतु, त्यांना मदत मिळू शकली नाही. त्यांची व्यथा युवासेनेच्या कार्यकर्त्यांना कळाली. त्यांनी अदित्य ठाकरेंपर्यंत हा विषय पोहचवला. तर, आदित्य ठाकरे यांनी तत्काळ राहुल कनल आणि हुसैन शाह या कार्यकर्त्यांच्या मार्फत अब्दूल यांच्याकडे एक लाख रुपयाची रक्कम सुपूर्द केली,तसेच यापुढे येणाऱ्या उपचाराचा खर्चही उचलण्याचे आश्वासन आदित्य यांनी केले. यामुळे अब्दूल यांनी आदित्य ठाकरेंचे मनापासून आभार मानले.