माथेरानसाठी हा रस्ता ठरणार वरदान; पर्यटकांनाही खूशखबर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 August 2020

माथेरानमध्ये ब्रिटीश काळापासून स्वयंचलीत वाहनांना बंदी आहे. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांन पायी प्रवास, हातरिक्षा आणि घोड्यांचा पर्याय स्वीकारावा लागतो. गावात प्रदूषण होऊ नये म्हणून वाहनांना बंदी आहे. स्वयंचलीत वाहने धावत नसल्याने गावातील रस्ते सुधारण्याकडेही लक्ष देण्यात आले नाही. गावात मुख्य रस्ता असलेला दस्तुरी नाका ते बाजारपेठ हा रस्ताही त्याला अपवाद नाही.

नेरळ : तीव्र चढाव आणि उताराचे ओबडधोबड रस्ते हे माथेरानच्या पर्यटन व्यवयायातील मोठा अडथळा समजण्यात येतात. परंतु लवकरच ती दूर होणार आहे. पालिकेने यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून दस्तुरी नाक्‍यापासून पांडे प्ले ग्राउंडपर्यंतचा साडे पाच किलोमीटरचा मुख्य रस्ता क्‍ले प्लेवर ब्लॉकद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे हा मार्ग धूळ विरहीत होणार आहे. विशेष म्हणजे चढाव कमी केले करण्यात येत आहेत. यासाठी 46 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. हा पक्क रस्ता झाल्यानंतर ई रिक्षा सुरू करण्याची मागणी जोर धरू शकते.

हे वाचा : कोव्हिड कट कडे तरूणाईचा कल 
माथेरानमध्ये ब्रिटीश काळापासून स्वयंचलीत वाहनांना बंदी आहे. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांन पायी प्रवास, हातरिक्षा आणि घोड्यांचा पर्याय स्वीकारावा लागतो. गावात प्रदूषण होऊ नये म्हणून वाहनांना बंदी आहे. स्वयंचलीत वाहने धावत नसल्याने गावातील रस्ते सुधारण्याकडेही लक्ष देण्यात आले नाही. गावात मुख्य रस्ता असलेला दस्तुरी नाका ते बाजारपेठ हा रस्ताही त्याला अपवाद नाही. त्यामुळे माथेरान पालिकेने अनेक वर्षांपासून रस्ते दुरूस्तीकडे लक्ष देण्याची मागणी विविध स्तरावर केली आहे. 2019 मध्ये या बाबतचे सर्व अडथळे झाल्यानंतर दस्तुरी नाका, अमन लॉज ते माथेरान रेल्वे स्टेशन आणि पुढे पांडे प्ले ग्राउंड या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. 

हे वाचा : वाढीव विलाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता

एमएमआरडीए च्या नियंत्रणाखाली काम सुरू आहे. यासाठी 46 कोटींचा निधी मंजूर आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर एमएमआरडीए चे कार्यकारी अभियंता अरविंद ढाबे यांनी कामाची पाहणी केली आहे. मार्गातील महात्मा गांधी रोड वरील सर्वाधिक तीव्र असा चढाव आहे. तो दूर करावा, अशी मागणी माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, सभागृह नेते प्रसाद सावंत आणि सर्व लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यालाही यश आले आहे. 

ई रिक्षाचा मार्ग मोकळा 
माथेरानमध्ये प्रदूषण विरहित ई रिक्षा सुरू करण्याच्या मागणी आहे. गावातील मुख्य रस्ता मजबूत होत असल्याने ही मागणी आता जोर धरेल. ई रिक्षामुळे पर्यटकांबरेबरच विद्यार्थी, जेष्ठ नागरिक आणि महिलांचा प्रवास सुकर होईल. 2021 मध्ये पूर्ण होईल, असा अंदाज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: his road will be beneficial for Matheran; Good news for tourists too