Shiv Sena History: चक्क इंदिरा गांधींसाठी शिवसेनेने पुकारला होता बंद ! जाणून घ्या इतिहास

historical data of shivsena and congress friendship
historical data of shivsena and congress friendshipesakal

काँग्रेस हा धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारा पक्ष तर शिवसेना हा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष. दोघांची वैचारिक भूमिका इतकी भिन्न की त्यातून विस्तवही जाऊ नये. मात्र, 2019 साली राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालच्या सरकारला मिळालेल्या काँग्रेसच्या पाठिंब्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र काँग्रेस-शिवसेनेनं एकमेकांच्या पाठिशी उभं राहण्याचं हे पहिलं प्रकरण नव्हतं.

मुंबईत साठच्या दशकात डावे पक्ष प्रबळ झाले होते. सत्ताधारी काँग्रेससाठी ही डोकेदुखी ठरत होती. 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. त्यावेळी डाव्या पक्षांना शह देणारा पक्ष म्हणून काँग्रेसनंच शिवसेनेला खतपाणी घातल्याचा आरोप व्हायचा. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा शिवसेनेवर वरदहस्त होता, अशीही तेव्हा चर्चा होती. त्यामुळे शिवसेनेचा वसंतसेना असा उपाहासानं उल्लेख केला जायचा.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीला बाळासाहेब ठाकरेंनी पाठिंबा दिला होता. 1978 मध्ये जनता सरकारनं इंदिरा गांधींना अटक केली होती, तेव्हा त्याविरोधात शिवसेनेनं बंदही पुकारला होता.

काँग्रेस नेते मुरली देवरा 1977मध्ये मुंबईचे महापौर झाले. त्यांना शिवसेनेनं महापौरपदासाठी जाहीर पाठिंबा दिला होता. काँग्रेस नेते बॅरिस्टर ए आर अंतुले मुख्यमंत्री असताना, त्यांच्या पाठिंब्यावर शिवसेनेच्या तीन सदस्यांची विधानपरिषदेवर निवड झाली होती.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएनं 2007मध्ये राष्ट्रपतीपदासाठी प्रतिभा पाटील यांना उमेदवारी दिली होती..एनडीएचे उमेदवार भैरोसिंह शेखावत हे होते. मात्र, बाळासाहेब ठाकरेंनी मराठी व्यक्ती राष्ट्रपती व्हावा, असं म्हणत प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता.

2012च्या  राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांच्या पारड्यात मत टाकण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला होता. त्यावेळी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएनं पीए संगमा यांना पाठिंबा दिला होता.

या सर्व घडामोडी पाहता, राजकारणात कधीही काहीही घडू शकतं. कोणाचीही कोणाशीही युती होऊ शकते, हे पुन्हा सिद्ध होतं.

Webtitle : historical data of shivsena and congress friendship

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com