esakal | इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय; एप्रिल महिन्यात 'इतक्या' विकल्या गेल्यात गाड्या
sakal

बोलून बातमी शोधा

इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय; एप्रिल महिन्यात 'इतक्या' विकल्या गेल्यात गाड्या

लाॅकडाॅऊनमुळे एप्रिल महिन्यात वाहन विक्रीला मोठा ब्रेक; कामगारांना फटका

इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय; एप्रिल महिन्यात 'इतक्या' विकल्या गेल्यात गाड्या

sakal_logo
By
चंद्रकांत दडस

मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी लाॅकडाऊन दरम्यान देशभरातील वाहन कंपन्यांनी उत्पादन बंद ठेवल्याने वाहन विश्वाच्या इतिहासात प्रथमच सरलेल्या एप्रिल महिन्यात एकाही वाहनाची विक्री झाली नाही. याचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. 

वाहन कंपन्या प्रत्येक महिन्याच्या अखेरीस वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर करतात. ताज्या आकडेवारीनुसार मारुती सुझुकी, टोयोटा यांसारख्या नामांकित वाहन कंपन्यांसह इतर वाहन कंपन्यांच्या कोणत्याही वाहनाची विक्री एप्रिलमध्ये करण्यात आली नाही. त्यामुळे वाहन विक्री शून्य झाली आहे. ३ मे पासून देशभरातील काही भागात लाॅकडाऊन शिथिल करण्यात येणार असल्याने काही प्रमाणात वाहनांची विक्री होईल, मात्र मुंबई, पुणे, दिल्ली या सर्वाधिक वाहन विक्री होणाऱ्या भागात लाॅकडाऊन कायम असल्याने विक्रीची आकडेवारी फार समाधानकारक नसेल असे वाहन तज्ज्ञांनी म्हटले आहे.

बापरे!  ब्लॅकने विकलं जातंय कोरोनातून बरं झालेल्या रुग्णाचं रक्त?

साधारणपणे प्रत्येक महिन्यात २.१० लाख वाहनांचे उत्पादन घेण्यात येते. यात दुचाकी, कार, एसयूव्ही, ट्रक्स आणि बसेस यांचा समावेश असतो. मात्र एप्रिल महिन्यात या उत्पादनाला पूर्णपणे ब्रेक लागला. तसेच लाॅकडाऊन असल्याने वितरकांनीही विक्री बंद ठेवली आहे. 

वाहन क्षेत्र देशातील मोठी बाजारपेठ असून जवळपास ३५ लाखापेक्षा अधिक लोक या व्यवसायात आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेतही या क्षेत्राचे मोठे योगदान आहे. असे असताना विक्री ठप्प झाल्याने त्याचा मोठा फटका या व्यवसायाला बसला आहे. 

स्पेशल क्षण, फोटो, लव नोट्स ! लॉकडाऊनच्या काळात डिजीटल प्रेमाला फुटले धुमारे

मदत जाहीर करण्याची मागणी : 

यापूर्वी इतके मोठे संकट वाहन क्षेत्रावर आले नव्हते. हे नुकसान भरून काढण्यासाठी मोठा वेळ लागेल. सरकारने या क्षेत्रासाठी तात्काळ मदत जाहीर करण्याची गरज आहे. आर्थिक संकट घोंघावत असल्याने ग्राहकही वाहन खरेदीसाठी यापुढे उत्सुक असणार नाहीत. बीएस ४ मानक इंजिनच्या वाहन विक्रीची परवानगी न्यायालयाने कायम ठेवण्याची गरज असल्याचे मत वाहन कंपन्या व्यक्त करत आहेत.

कोविड विषाणूचा मोठा फटका वाहन उद्योगाला बसला आहे. सध्याची स्थिती अतिशय आव्हानात्मक आहे. ग्राहकांना वाहन खरेदीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा पर्याय उपलब्ध करून देत आहोत. - नवीन सोनी, उपाध्यक्ष, विक्री आणि सेवा, टोयोटा किर्लोस्कर मोटर्स.

history made in maharashtra not a single car sold in lockdown read important report

loading image