esakal | POCSO: मुलीचा हात पकडून प्रपोज करणे लैंगिक अत्याचार नाही- कोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

court

पोक्सो कोर्टाने लैंगिक अत्याचाराप्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. अल्पवयीन मुलीचा हात पकडून प्रेमाची कबुली देणे लैंगिक अत्याचार मानले जाऊ शकत नाही, असं मुंबई पोक्सो कोर्टाने म्हटलं आहे.

POCSO: मुलीचा हात पकडून प्रपोज करणे लैंगिक अत्याचार नाही- कोर्ट

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मुंबई- पोक्सो कोर्टाने लैंगिक अत्याचाराप्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. अल्पवयीन मुलीचा हात पकडून प्रेमाची कबुली देणे लैंगिक अत्याचार मानले जाऊ शकत नाही, असं मुंबई पोक्सो कोर्टाने म्हटलं आहे. एका २८ वर्षीय आरोपीने २०१७ मध्ये एका १७ वर्षीय मुलीचा हात पकडून तिला प्रपोज केले होते. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली होती. (holding hand of a minor proposing love to her not sexual assault says pocso court mumbai)

कोर्टाने सुनावणीदरम्यान म्हटलं की, असा कोणताही पुरावा नाही, ज्यामुळे सिद्ध होईल की आरोपीचा हेतू लैंगिक अत्याचार करण्याचा होता. निर्णय देताना कोर्टाने म्हटलं की, असा कोणतेही पुरावे नाहीत ज्यातून सिद्ध होईल की आरोपी वारंवार पीडितेचा पाठलाग करत होता. त्याने तिला एखाद्या निर्जन ठिकाणी अडवले किंवा अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्यासाठी बळाचा वापर केला.

हेही वाचा: एक थापड दिली की पुन्हा उठणार नाही; मुख्यमंत्र्यांचा इशारा

टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, न्यायमूर्तींनी निर्णय देताना म्हटलं की, आरोपीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला, याबाबत फिर्यादी पक्ष कोणतेही पुरावे सादर करु शकलेला नाही. त्यामुळे शंकेचा फायदा देत आरोपीची सुटका करण्यात येत आहे.

हेही वाचा: दगडफेक करणाऱ्यांना घडणार अद्दल; जम्मू-काश्मीरचा मोठा निर्णय

दरम्यान, कोर्टात आतापर्यंत अनेक प्रकरणे आलेत ज्यात आरोपीने मुलीचा हात पकडला आहे. पण, कोर्टाने याला गुन्हा मानण्यास नकार दिला आहे. याआधी मुंबई हायकोर्टाने पाच वर्षाच्या मुलीसोबत कथित छेडछाड केल्याप्रकरणी 50 वर्षीय व्यक्तीला दिलेली शिक्षा बदलली होती. कोर्टाने निर्णय देताना म्हटलं होतं की, पँट काढून एकाद्या अल्पवयीन मुलाचा हात पकडणे लैंगिक अत्याचाराच्या व्याख्येत मोडत नाही. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेंसेस ऍक्टला 'पोक्सो' (POCSO) म्हटलं जातं. याअंतर्गत १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसोबत होणाऱ्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी गुन्ह्यांबाबत सुनावणी केली जाते.

loading image
go to top