सुट्टीच्या दिवशी, वीकेंडला पूर्ण दिवस लोकल प्रवासाची मुभा द्या; प्रवासी संघटनेची मागणी  

सुट्टीच्या दिवशी, वीकेंडला पूर्ण दिवस लोकल प्रवासाची मुभा द्या; प्रवासी संघटनेची मागणी  
Updated on

मुंबई: सर्वसामान्य प्रवाशांसाठी ठराविक वेळेत लोकल प्रवास सुरु झाल्याने एकीकडे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तर, अवेळी लोकल प्रवासाची वेळ असल्याने प्रवाशांमध्ये निराशा आहे. खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वेळेवर कार्यालयात पोहचता येत नाही. त्यामुळे वीकेंड आणि इतर सुट्टीच्या दिवशी सर्व सामान्य प्रवाशांना पूर्ण दिवस प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी प्रवासी संघटनेकडून करण्यात आली आहे.

मुंबईच्या उपनगरी रेल्वेने सर्व सामान्य प्रवासासाठी ठरवून दिलेल्या वेळा खासगी क्षेत्रातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांना आणि अन्य लोकल प्रवाशांना सोयीस्कर नाहीत. या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सामान्य जनतेला पूर्णवेळ लोकल प्रवास उपलब्ध करून द्यावा, अशी नवी मागणी रेल्वे प्रवासी महासंघाने राज्य सरकारकडे केली आहे.

लोकल प्रवास पूर्णवेळ उपलब्ध नसल्यामुळे कसारा, कर्जत, खोपोली, वसई, विरार, पनवेल भागातील प्रवाशांना गेल्या दहा महिन्याहून अधिक काळ लोकलने मुंबईला जाऊ शकले नाहीत. रुग्णालयातील उपचार, नातेवाईकांच्या भेटी अन्य काही महत्वाची कामे, खरेदी अशा गोष्टी करता आल्या नाहीत, असे महासंघाकडून सांगण्यात आले.

सर्वसामान्य प्रवाशांनी गर्दीच्या वेळी प्रवास करू नये, असे निर्देश राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. राज्य सरकारने यासाठी वेळेचे नियोजन आखले आहे. मात्र या नियोजनामुळे कार्यालयात वेळेत पोहचणे शक्य होत नाही. अनेक वेळा लेट मार्क लागणे, हाफ डे होणे अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शनिवारी, रविवारी आणि इतर सुट्यांच्या दिवशी पूर्ण दिवस लोकल प्रवास करण्याची मुभा दिल्यास कार्यालयात लवकर पोहचता येईल, छोट्या व्यापाऱ्यांना सामग्रीची खरेदी करता येणे शक्य होईल, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.

सरकारी, निम सरकारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना शनिवारी, रविवारी सुट्टी असते. शनिवारी, रविवारी लोकलमध्ये गर्दीचे प्रमाण कमी असते. पीक अव्हरला देखील विरळ गर्दी असते. त्यामुळे यावेळी सर्व सामान्य प्रवाशांना परवानगी देण्यात यावी, अशी प्रतिक्रिया उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर शेलार यांनी दिली.

---------------------

(संपादन- पूजा विचारे)

On holidays allow full day local train travel weekends Demand for travel association

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com