कंगनाच्या अडचणीत वाढ; ड्रग्जप्रकरणी गृहविभागाकडून मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश

अनिश पाटील
Friday, 11 September 2020

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतची अंमली पदार्थ प्रकरणी चौकशी करण्याबाबतचे लेखी आदेश गृहविभागाकडून मुंबई पोलिसांना प्राप्त झाले आहेत.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतची अंमली पदार्थ प्रकरणी चौकशी करण्याबाबतचे लेखी आदेश गृहविभागाकडून मुंबई पोलिसांना प्राप्त झाले आहेत.  गुन्हे शाखेला याप्रकरणी तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

ड्रग्जच्या विषयाकडे मुंबई पोलिसांनी बारकाईने लक्ष देण्याची गरज; शरद पवार यांची सूचक प्रतिक्रीया

मात्र, हा तपास विशेष पथकाकडून करायचा की अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून यासंबंधी अद्याप मुंबई पोलिसांनी निर्णय घेतलेला नाही. "कंगना राणौत आणि अध्ययन सुमन यांच्यात संबंध होते. अध्ययन सुमनने एका मुलाखतीत कंगना ड्रग्ज घेत असून तिने आपल्यावरही जबरदस्ती केल्याचे सांगितले होते. मुंबई पोलिस याप्रकरणी अधिक माहिती घेत आहेत', असे आपण विधानसभेत सांगितल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. आमदार सुनील प्रभू आणि प्रताप सरनाईक यांनी दाखल केलेल्या विनंतीवर आपण हे उत्तर दिल्याचे ते म्हणाले. 

मुंबईच्या चिंतेत आणखी भर! कोव्हिड रुग्णांसाठी आयसीयू बेड्सची कमतरता; नर्सिंग होम बंद झाल्याने फटका

कंगनाने याबाबत ट्विट करत आव्हान दिले होते की, 'मुंबई पोलिस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची मी आभारी आहे. कृपया माझी ड्रग्ज टेस्ट करा. माझे सर्व कॉल रेकॉर्ड तपासा. तुम्हाला ड्रग्ज तस्करांसोबत माझा कोणताही संबंध आढळला तर, मी माझी चूक मान्य करेन आणि कायमची मुंबई सोडून देईन.' तसेच, तुमच्यासोबतच्या भेटीची वाट पाहत असल्याचेही कंगनाने म्हटले आहे.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Department orders probe of kanganaranaut