रुग्णांना होम क्वारंटाईन करणं ठरतंय फायदेशीर; गंभीर रुग्णांसाठी बेड्स झाले रिकामे.. 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 June 2020

गेल्या काही महिन्यांत पहिल्यांदाच शहरातील गंभीर कोरोना रूग्णांवर उपचार करणाऱ्या  रुग्णालयात कोरोना बेड रिक्त झाले  आहेत. त्यामुळे प्रतीक्षा कालावधी कमी झाला आहे.

मुंबई : गेल्या काही महिन्यांत पहिल्यांदाच शहरातील गंभीर कोरोना रूग्णांवर उपचार करणाऱ्या  रुग्णालयात कोरोना बेड रिक्त झाले  आहेत. त्यामुळे प्रतीक्षा कालावधी कमी झाला आहे. कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण घटले नसले तरी अशा कोरोना रूग्णांचे  घरात अलगिकरण करण्यात येत आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येतही रुग्णालयात खाटा रिकाम्या आहेत. 

शुक्रवारी दुपारी 2.30 पर्यंत शहरात 27 हजार 634 सक्रिय रुग्ण आढळले होते, परंतु 18 हजार 380 पैकी फक्त 12 हजार 303 बेड भरलेले होते. म्हणजेच 55 टक्के रूग्ण घरी उपचार घेत होते.

  हेही वाचा: मुंबईकरांनो आनंदाची बातमी!  गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तलावात अधिक पाणीसाठा..

बाकी गंभीर रुग्ण कमी असल्याने  आयसीयू बेड्सच्या वापरात घट झाली. पूर्वी  बेड उपलब्धीचा दर एप्रिल ते मे दरम्यान 99% होता तर तो खाली आता 93% पर्यंत आला आहे.  शुक्रवारी संध्याकाळी शहरातील 1 हजार 278 आयसीयूपैकी बेड पैकी 95 बेड रिक्त होते.

केईएम रुग्णालय गंभीर रूग्णांसाठी 490 खाटांची कोविड सुविधा बनविण्यात आली आहे.  गेल्या आठवड्यात दररोज 70 ते 80 कोविड रुग्ण रुग्णालयात दाखल होत होते. ती संख्या आता 35 ते 40 पर्यंत आली आहे. अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. तसेच शुक्रवारी किमान 14 खाटा रिकाम्या होत्या. एप्रिल आणि मे महिन्यात,  जमिनीवर आणि व्हीलचेअरवर रूग्णांवर उपचार होत होते असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

सध्या रुग्ण संख्या कमी झाल्याने सध्या वोर्ड मध्ये रुग्ण आणि कर्मचाऱ्यामधले वाद कमी झाले आहेत. आणि रुग्णांना खाटा मिळू लागल्या आहेत. अशीच स्थिती नायर रुग्णालयात दिसून येत आहे. पूर्वी या रुग्णालयात दररोज सुमारे  90 रुग्ण दाखल होत होते. मात्र सध्या ही संख्या  50 ते 60 पर्यंत आली असल्याची माहिती नायर रुग्णालय प्रशासनाने दिली.

काही खासगी रुग्णालयातही रुग्ण घट होत असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून मोठ्या खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत.  सध्या डॉक्टरांचा आत्मविश्वास वाढला असून ते लोकांना घरी आयसोलेशन होऊन उपचार घेण्याचा सल्ला देत असल्याने बेडची उपलब्धता वाढली आहे. कोरोना रुग्णामध्ये जरी वाढ होत असली तरी त्यांचा गंभीर पणा कमी झाला आहे. असे तज्ञ डॉक्टर सांगतात. 

हेही वाचा: सावधान! 'Zoom App' वापरताय? मग सावध राहा; महाराष्ट्र सायबर विभागाचं नागरिकांना आवाहन.. 

घरी उपचार घेणाऱ्या रुग्णाच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयातील गर्दी कमी होऊन खाटांची उपलब्धता वाढली आहे. अधिक रुग्ण घरी उपचारांचा पर्याय निवडत आहेत असे अतिरिक्त नगरपालिका आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगितले. वॉर्ड मधील डॉक्टर घरी असलेल्या असलेल्या रुग्णांची काळजी घेत आहेत तर काही रुग्ण स्वतःच्या डॉक्टरकडून उपचार घेत आहेत. शहरात सध्या 961 गंभीर रूग्ण आहेत अशी माहिती ही त्यांनी दिली.
home quarantine is benificial for hospitals read full story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: home quarantine is benificial for hospitals read full story