
लॉकडाऊनकाळात सुरूवातीला कौटुंबिक वाद वाढू लागलाच्या तक्रारी मानसोपचार तज्ज्ञांकडे येत होत्या. पण आता तीन महिन्याचा लॉकडाऊनचा काळ गेल्यावर या कौटुबिक वादाचे प्रमाण काही प्रमाणत कमी झाले.
मुंबई लॉकडाऊनकाळात सुरूवातीला कौटुंबिक वाद वाढू लागलाच्या तक्रारी मानसोपचार तज्ज्ञांकडे येत होत्या. पण आता तीन महिन्याचा लॉकडाऊनचा काळ गेल्यावर या कौटुबिक वादाचे प्रमाण काही प्रमाणत कमी झाले. पूर्वी 50 टक्के कौटुंबिक वाद समुदेशनासाठी येत होते पण आता त्यामध्ये 20 टक्क्यांनी घट झाली आहे.
30 टक्के वाद समुपदेशनासाठी येतात. त्यामध्ये समुपदेशन होऊन मार्ग निघतो. सद्य परिस्थितीशी जुळवून घेण्याची व एकमेकांना समजून घेण्याची मानसिकता निर्माण होत असल्याने वाद कमी होत आहे, असे मानसोपचार तज्ज्ञांचे निरिक्षण आहे.
हेही वाचा; अरे वाह! जेजे-सेंट जॉर्ज रुग्णालयाला मिळणार अपडेटेड व्हेंटिलेटर; कंपनीने घेतले "ते" व्हेंटिलेटर परत..
लॉकडाऊनच्या काळात सुरूवातील प्रत्येक व्यक्ती घरात लॉकडाऊन झाली. त्यांची स्पेस हिरावली जाते असे भासत होते. तसेच एकमेकांचे स्वभाव वेगळे, कामाचा ताण यामुळे वाद निर्माण होऊ लागले. तीन महिने लोक लॉकडाऊनमध्ये आहे. पहिले लोकांना आशा होती एक - दोन महिन्यात ही परिस्थिती सुधारेल आणि आपण पहिल्यासारखे जीवन जगू. पण कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणखी काही महिने ती बदलणार नाही आणि आता आपल्याला त्या परिस्थितीशी जुळवून घेत जीवनक्रम चालू ठेवावा लागणार आहे, अशी मानसिकता त्यांची तयार झाली आहे.
त्यामुळे लोक कुटूंबातील सदस्यांशी जुळवून घेत त्याची सवय करत आहे. त्यामुळे वादाचे प्रमाण कमी झालेले असू शकते, असे मुंबई विद्यापीठ उपयोजित मानसशास्त्र व समुपदेशन विभागाचे प्रमुख डॉ. विवेक बेल्हेकर यांनी सांगितले. तसेच म्हणाले, पूर्वी समुपदेशासाठी कौटुंबिक वादाच्या केसेस आमच्याकडे 50 टक्के येत होत्या. त्याचे प्रमाण आता कमी होऊन 30 टक्क्यांवर आले आहे.
कोरोनामुळे लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे माणस एकामेकांपासून दुरावली. लोकांमध्ये एकाकी पडण्याची भावना निर्माण झाली. मित्र परिवार, नातेवाईक या काळात दूरावले आहेत. केवळ आपल्या घरची लोक आपल्यासोबत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती बदलायला अजून वेळ लागणार आहे. अशा परिस्थिती आपल्याला साथ आपल्या घरची लोक देणार ही भावना लोकांमध्ये हळूहळू रुढ होत आहे.
आजूबाजूच्या परिस्थितीतून लक्षात येते की, कोरोनाच्या काळा रुग्णालयात असो वा मृत्यूनंतर स्मशनात ही आपली जवळची व्यक्ती सोबत असते. तीच व्यक्ती आपली काळजी घेते. यातून सुरुवातीच्या काळात नात्यामध्ये दुरावा आला होता तो आता कमी होत आहे. न पटणारी व्यक्ती सुद्धा आता एकत्र येऊन एकमेकांना धीर देत आहे. एकमेकांना समजून घेत आहे, आपल्या काही झालं तर या काळात आपलीच माणसं आपल्यासोबत असतील, ही मानसिकता आता लोकांमध्ये प्रबळ होत आहे, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितले.
सासू-सुन्यांचे, आई-वडिल आणि मुल, नवरा -बायको असे पूर्वी जे वादासाठी मला फोन येत होते. ते आता कमी झाले. उलट कठिण परिस्थिती आता आम्ही एकमेकांना कसे सांभाळून घेतो, आधार देतो असे फोन माझे रुग्ण मला आता करतात, असे शुभांगी पारकर म्हणाल्या.
home violence decreased by 20 percent