

Mumbai House Price Report
ESakal
बापू सुळे
मुंबई : मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे धनदांडग्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांचेच स्वप्न असते. सध्या मुंबईतील घरांच्या किमतीचा परवडणारा दर (अफोर्डेबिलिटी इंडेक्स) ४७ टक्के एवढा म्हणजे नोकरदारांच्या मासिक कमाईची सुमारे अर्धी रक्कम घरासाठी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यावर खर्च करावी लागत असल्याचे नाइट फ्रॅंक इंडियाच्या अहवालातून समोर आले आहे. देशातील इतर महानगरांचा विचार करता मुंबईत घर घेणे परवडत नसल्याने अनेकांच्या स्वप्नाला ‘घरघर’ लागत असल्याचे चित्र आहे.