
Honeytrap Scandal: राज्यातले वरिष्ठ अधिकारी, माजी मंत्री, नेते हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले असल्याची माहिती समोर आली होती. आता या प्रकरणात एका महिलाचे चौकशी सुरू आहे. त्या महिलेनं खळबळजनक खुलासे केले आहेत. नाशिकमधील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये अधिकारी आणि नेत्यांसोबत महिलेनं शरीरसंबंध ठेवून त्यांना ब्लॅकमेल केल्याचं समोर आलं होतं. संबंधित महिला नाशिकची असून सध्या ठाण्यात वास्तव्याला असल्याची माहिती समजते. महिला होमगार्ड म्हणून ती कार्यरत होती. यानंतर हनीट्रॅपच्या माध्यमातून तिनं मोठ्या प्रमाणावर अधिकारी आणि नेत्यांकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे. या महिलेनं पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक दावे केले आहेत.